Sunday, August 16, 2020

अंकलखोप परिसर महापुराच्या विळख्यात



अंकलखोप / वार्ताहर

        औदुंबर दत्त मंदिरामध्ये शिरले पाणी..
कृष्णा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ..
कृष्णा नदी पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ होत असून औदुंबर येथील दत्त मंदिरा मध्ये पाणी शिरले आहे तर नागठाणे चा बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे.कृष्णा नदी पाणी पातळीत झपाट्याने होत असलेली वाढ पाहता, नदीकाठावरील नागरिकांमध्ये महापुरा बाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी पाणी पात्रामध्ये झपाट्याने वाढ होत असून, श्री क्षेत्र औदुंबर येथील श्री दत्तमंदिरामध्ये रविवारी सकाळी पाण्याने प्रवेश केला. त्याचबरोबर भिलवडी येथील कृष्णा घाटा समोरील दोन्ही मंदिरे पाण्याखाली गेली असून नागठाणे येथील बंधाराही शनिवारी रात्री पाण्याखाली गेला आहे. पाणी पातळीत होणारी वाढ पाहता श्री दत्त देवस्थान  सुधार समितीने श्रींची मुर्ती जुने मंदिर देवघरात ठेवली असून, श्रींच्या सर्व धार्मिक विधी तेथेच करण्यात येणार आहेत.अशी माहिती देवस्थान सुधार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.