Friday, October 9, 2020

श्री दत्त गुरूंच्या पादुका या विषयी


विमल पादुका



*_🦶🏻पादुका🦶🏻_*

श्रीदत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्व आहे. श्रीदत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त सांप्रदायात गुरूपेक्षा गुरु चरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त पंथीयात श्रीगुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्व आहे. श्रीगुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजनाचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवशक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण-स्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तांत संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानांत दत्त मूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे. - #श्रीगुरूशरणं 🙏

पादुका दर्शन हां दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे. विविध श्री दत्त क्षेत्री विविध प्रकारच्या पादुका 
1 श्री विमल पादुका -  औदुंबर 
2 श्री मनोहर पादुका - नृसिंहवाड़ी
3 श्री निर्गुण पादुका - लाड कारंजा 
4 श्री निर्गुण पादुका -  गाणगापुर
5 श्री निर्गुण पादुका - लातूर
6 श्रीपाद श्रीवल्लभ पादुका - कुरवपुर
7  श्री करुणा पादुका - कड़गंची
8 श्री स्वामी समर्थ पादुका - अक्कलकोट
9 श्रीपाद श्रीवल्लभ पादुका - पीठापुर
10 श्री दत्त पादुका - गिरनार
11 श्रीशेष दत्त पादुका - बसवकल्याण
12 अवधूत पादुका - बाळेकुन्द्री
13 प्रसाद पादुका - वासुदेव निवास.