Saturday, November 26, 2022

दि. ५ डिसेंबर पासुन श्री. दत्त जन्मोत्सवास प्रारंभ उत्सव ५ दिवस, बुधवारी प्रधान दिवस सांगली अंकलखोप - औदुंबर (ता. पलुस )

दि. ५ डिसेंबर पासुन श्री. दत्त जन्मोत्सवास प्रारंभ
उत्सव ५ दिवस, बुधवारी प्रधान दिवस


सांगली

अंकलखोप - औदुंबर (ता. पलुस ) येथील श्री. दत्तगुरू यांची जयंती उत्सव सोमवार ( दि. ५ ) पासुन सुरू होत आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन श्री दत्त सेवाभावी मंडळाने केले आहे. यात सोमवार दिनांक ५ रोजी संग्रहमख श्री दत्त योग, सह विविध धार्मिक कार्यक्रम व होम हवन होणार आहेत. मंगळवार दि. ६ रोजी एक दिवसीय श्री गुरू चरित्र पारायण सोहळा होणार आहे.

बुधवार दि. ७ हा प्रधान दिवस आहे. पहाठे ५ पासुन विविध धार्मिक कार्यक्रमाची सुरूवात होत असुन, प.५ ते ६. ३० वा. काकड व मंगल आरती, सकाळी ६. ३० ते ११. ३० अभिषेक, दरम्यान सकाळी १० नियोजित अन्नछत्र वास्तुचे भुमिपुजन सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी १ पर्यत महापुजा, नैवद्य, व महाआरती, दुपारी ४ ते ५ .३० वा. श्री दत्तगुरूंच्या जन्माचे वासुदेव जोशी यांचे किर्तन होईल. सांयकाळी ५ .३० वा श्री दत्तगुरूचा जन्म काळ सोहळा सुरू होईल. रात्री ७ .३० ते ९ . ३० वा. धुपारती, पालखी, मंत्रपुष्पांजली, करूणा त्रिपादी होईल.
गुरूवारी ( दि.८) उत्सवाचा चतुर्थ दिवस प.५ ते ६. ३० वा. काकड व मंगल आरती, सकाळी ६. ३० ते ११. ३० वा. अभिषेक, दुपारी १ पर्यत महापुजा, महानैवद्य. दुपारी १ ते ३ वा. या वेळेत श्री दत्त सेवा भावी ट्रस्ट, औदुंबर - अंकलखोप यांच्यावतिने मंदीर परिसरात होणार आहे. तर पुजारी संदीप जोशी यांच्याकडुन अवधुत मंगल कार्यलय येथे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सांयकाळी ६ ते ७ : ३० माऊली व आनंदी भजनी मंडळ यांचे भजन, रात्री १२.१५ ते १.१५ वा. धुपारती, पालखी, मंत्रपुष्पांजली
शुक्रवार ( दि ९ )रोजी पहाठे ५ ते ६.३० वा. लळीताचे किर्तन वासुदेव जोशी, नितीन गुरव, संतोष जोशी यांचे होईल. सकाळी ६. ३० वा. काकड आरती, महापुजा, मंगल आरती नंतर श्री दत्त जन्मोत्सवाची समाप्ती होईल.